Ads

भद्रावती नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराची मानकरी


Honorary recipient of Bhadravati Municipal Council Clean Survey Award
भद्रावती(तालुका प्रतिनिधी):-स्वच्छ सर्वेक्षण २०२१, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात येणार असून दि.२० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पार पडणा-या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण भद्रावती नगर परिषदेला नुकतेच मिळाले आहे.
'स्वच्छ सर्वेक्षण २०२१' या पुरस्काराकरीता भद्रावती नगर परिषदेची निवड करण्यात आली आहे. दि.२० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पुरस्कार सोहळा-अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.पुरस्कार स्वीकारण्याकरीता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि इतर दोन प्रतिनिधी अशा चार व्यक्तींनाच पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रवेश दिला जाणार आहे. भद्रावती नगर परिषदेला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी पिदुरकर, आरोग्य विभाग व स्वच्छता विभाग यांचे अभिनंदन केले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment