चंद्रपुर :-दिनांक १२/११/२०२१ रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रारदार यांनी तक्रार दिली की, दिनांक ११/११/२०२१ रोजी पासुन कुटूंबासह बाहेर गावी गेलेला असताना दिनांक १२/११/२०२१ ला घरी येवुन बघीतले तेव्हा त्याचा घराचा दरवाजाला लावलेला कुलूप तुटुन दिसले व आलमारी मध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे तसेच रोख रक्कम असा एकुण १,४४,००० /- रू चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क. १९३६ / २०२१ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गुन्हयात चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागीने व अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी रामनगर गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अतिशय परिक्षम घेवुन मुखबीरचे खबरे वरून एक संशईत विधीसंघर्षग्रस्त बालक रा. फुकट नगर राजीव गांधी नगर चंद्रपुर यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याचे कडुन १) पिवळया धातुची बादामी अंगुठी अं. वजन ५ ग्रॅम कि. २२,५००/- रू, २) पिवळया धातुचे टॉप्स अं. वजन ३.८ ग्रॅम कि.अं. १५,००० /-रू, ३) पिवळया धातुचे शॉर्ट पोत व डोरले एकुण अंदाजे वजन ९ ग्रॅम अं. कि ३५,०००/- रू, ४) पिवळया धातुचे गोप अंदाजे वजन १५ ग्रॅम अं.कि. ६०,०००/- ५) पिवळया धातुचे ५ कंठमणी एकुण अंदाजे वजन २ ग्रॅम कि. अं. ६,००० / - रू, असा एकुण १,३८,५००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. नंदनवार, यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे सपोनि. संदिप धोबे, सपोनि. हर्षल ओकरे, पोउपनि. विनोद भुरले, पो हवा. रजनीकांत पुठ्ठावार, नापोशि पुरुषोत्तम चिकाटे, विनोद यादव, पेतरस सिडाम, संजय चौधरी, किशारे वैरागडे, आनंद खरात, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिश अवथरे, पोशी लालु यादव, विकास जुमनाके, माजीद पठान, हिरालाल गुप्ता यांनी केली आहे.Police Ramnagar Crime Investigation Squad recovered Rs. 1,38,500 from a burglar. Confiscated
0 comments:
Post a Comment