Ads

अतिक्रमण धारक शेतकरी ई-पीक नोंदणी पासून वंचित.

दुर्योधन घोंगडे (मुल)चंद्रपूर:-
महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद ई -पीक द्वारे करण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची ई-पिक मध्ये नोंदच होत नसल्याने अतिक्रमणधारक शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद करण्यासाठी सुलभ व सहज जावे म्हणून हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असताना ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने नोंदणी करताना खातेधारक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत असताना दुसरीकडे अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची ई-पिक मध्ये नोंदच होत नसल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने अतिक्रमणधारक शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने यावर विचार करून अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांकडून होत आहे.

ई-पीक पाहणी राज्यभर राबविण्यात येत असून टाटा ट्रस्टच्या सहाय्याने अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.शेतकरी ॲपद्वारे आपल्या शेतातील पिकाची नोंद सात बारावर स्वतःच करणार असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. परंतु वडिलोपार्जित, वर्षानुवर्ष शेती करीत असलेल्या शेत जमिनीतील पिकाची नोंद अतिक्रमण धारक शेतकरी करीत असताना त्यांच्या पिकाची नोंदच होत नसल्याने भविष्यात इतर शासकीय कामासाठी अतिक्रमण शेतीचा दस्तऐवज प्राप्त होणे अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार असल्याने यावर शासनाने विचार करावा व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अतिक्रमण धारक शेतकऱ्यांद्वारे करण्यात आली आहे.

"माझ्याकडे वडिलोपार्जित वर्षानुवर्षे करीत असलेली अतिक्रमण शेती आहे. या शेतीमध्ये धानाचे उत्पन्न घेत आहे. या जमिनीचा पक्का पट्टा मिळावा म्हणून शासनाकडे कागदपत्र सादर केला आहे. यावर्षी शासनाने शेत जमिनीतील पिकाची नोंद ई-पिक मोबाईल द्वारे करण्याचे आवाहन केले आहे. परंतु अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्याची सुविधा ई-पिक मध्ये केली नसल्याने शासनाने यावर विचार करावा."
श्री. मारोती वैरागडे
अतिक्रमणधारक शेतकरी, चिचाळा.

"अतिक्रमण धारक शेतकरी बऱ्याच वर्षापासून सदर शेती वर उत्पन्न घेऊन, शेती करून आपला प्रपंच चालवित आहेत. ई-पिक नोंदणीपासून अतिक्रमण धारक शेतकरी वंचित आहेत. यावर शासनाने विचार करून ते करीत असलेल्या अतिक्रमण शेतातील पिकाची नोंद करण्यासाठी त्यांना ई -पीक मध्ये सामावून घ्यावे."
श्री. घनश्याम येनुरकर
अध्यक्ष, तालुका काँग्रेस पार्टी मुल.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment