Ads

मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी 'कलाकुसर'चा पर्याय.

चंद्रपुर :-
दिनांक 14 नोव्हेंबर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी म्हणजेच बालदिना निमित्त चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी वडगाव प्रभागातील लहान मुलांसाठी एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले.मागील दीड वर्षापासून कोरोना आपत्तीमुळे मुलांच्या शाळा बंद झालेल्या आहेत.ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर करणे भाग पडले.यामुळे अनेक मुलांना मोबाईलचे व्यसन जडलेले आहे.लहान मुलांनी मोबाईलचा अतिवापर सुरू केल्याने पालक सुद्धा चिंतेत आहेत. मात्र पालकांनी वारंवार सांगूनही मुलांच्या हातातून मोबाईल सुटत नाही अशी परिस्थिती घरोघरी दिसते. अशाप्रकारे जवळपास प्रत्येक घरी मोबाईलमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर उपाय म्हणून लहान मुलांना कलाकुसरचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम आपल्या प्रभागांमध्ये राबविण्याची सुरुवात देशमुख यांनी 14 नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त केली.वडगाव जुनी वस्ती येथील हनुमान मंदिरासमोरील प्रांगणामध्ये सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत मुलांना प्रशिक्षण देऊन या उपक्रमाची सुरूवात करण्यात आल
कला शिक्षिका प्रिती बैरम-पोटदुखे यांनी यावेळी मुलांना घरगुती वापराच्या वस्तू पासून विविध सुंदर टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.घरगुती वापराच्या दिव्यापासून अगरबत्तीचे स्टॅन्ड, प्लास्टिकच्या बॉटल पासून पेन स्टॅन्ड इत्यादी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.विशेष म्हणजे यावेळी जनविकास सेनेची पूर्ण टीम बाल मित्रांसोबत वस्तू तयार करण्यात रंगलेली दिसली.
 जनविकास सेनेच्या मनिषा बोबडे, इमदाद शेख, किशोर महाजन,आकाश लोडे,गीतेश शेंडे,नेत्रा इगुलवार,रमा देशमुख इत्यादींनी लहान मुलांना विविध वस्तू तयार करण्यासाठी सहकार्य केले.
यावेळी उपस्थित बालमित्रांशी संवाद साधताना नगरसेवक पप्पू देशमुख यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची माहिती दिली तसेच दररोज अशाप्रकारे कलाकुसर चा उपयोग करून मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी बालमित्रांना सहकार्य करणे हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच पालकांनी मुलांच्या मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी मुलांना रागावण्यापेक्षा त्यांना वेळ देऊन अशाप्रकारे कलाकुसर शिकण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी पालकांना केले. भविष्यात संपूर्ण प्रभागांमध्ये विविध ठिकाणी हा उपक्रम राबविणार असल्याचे सुद्धा त्यांनी जाहीर केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment