Ads

महाराष्ट्राच्या पैलवान शिवराज राक्षे चे वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खुल्या वजनी गटात (125 kg) सुवर्णपदक

Maharashtra wrestler Shivraj Rakshe wins gold in Senior National Wrestling Championship in Open Weight (125 kg)
महाराष्ट्राचा सुपुत्र व आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचा पठ्ठा पैलवान शिवराज राक्षे याने गोंडा अयोध्या उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खुल्या वजनी गटात (125 kg) सुवर्णपदक मिळवले.
शिवराज राक्षे ने अंतिम कुस्तीत हरियाणा च्या मोहित वर 3-1 ने विजय मिळवला तर इतर 4 कुस्त्या त्याने 10-0 ने तांत्रिक चितपट जिंकल्या.
महाराष्ट्राच्या इतिहासात वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खुल्या वजनी गटात किमान 50 वर्षानंतर शिवराज राक्षे याने सुवर्णपदक मिळवले आहे.महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला खुल्या वजनी गटात शिवराज च्या रूपाने एक नव्या दमाचा मल्ल मिळाला आहे.पुढील महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणीत शिवराज महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.
पै.शिवराज राक्षे याने महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय पैलवान अर्जुनवीर Dysp राहुल आवारे याचा आदर्श समोर ठेवत ही कामगिरी केल्याचे सांगितले.
त्याला अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्यासह पै.संदीप रासकर,पै.सुनील लिमन,पै.प्रकाश घोरपडे,पै.रणधीरसिंह पंघाल पै.शरद पवार
पै.ज्ञानेश्वर गोचडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पै.शिवराज राक्षे याचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment