Ads

महेश नगर येथे आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबीरात शेकडो नागरिकांचा सहभाग


Hundreds of citizens participate in health check-up and vaccination camp at Mahesh Nagar
चंद्रपूर, ता. २६ :शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर होत आहेत. हनुमान मंदिर, महेश नगर येथे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ७च्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी आयोजित आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबीरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

या शिबिराचे उदघाटन नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका माया उईके, नगरसेविका शीला चव्हाण, नगरसेवक अनिल फुलझेले यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान झोन एकच्या सभापती छबूताई वैरागडे यांनी शिबिराला भेट दिली. शिबिरात डॉ. नयना उत्तरवार, डॉ. देवयानी भुते यांनी आरोग्य तपासणी केली. सोबतच 250 हून अधिक नागरिकांची रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात आली. यावेळी 60 हून नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.

यावेळी कोविड लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित बचतगट महिला आणि नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी क्षयरोग, कुष्ठरोग, मलेरिया विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच समुदाय संघटक सुषमा करमरकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सरिता येरमे यांनी केले, तर आभार शामल रामटेके यांनी मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment