Ads

भारताच्या संविधानाबाबत जनता १०० टक्के साक्षर हवी : खासदार बाळू धानोरकर.

चंद्रपूर : भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या संविधान दिनानिमित्त त्यांनी संविधान कर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून खासदार बाळू धानोरकर यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारताच्या संविधानाबाबत जनता १०० टक्के साक्षर व्हायला हवी, संविधान घराघरात पोचावे. नागरिकांना आपले हक्क व कर्तव्ये यांची पूर्णपणे जाणीव असावी. तसेच आपल्या संविधानाप्रति व लोकशाही मूल्यांच्या प्रति जागरूकता करण्याची गरज असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी मत व्यक्त केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग तर्फे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, नगरसेविका सुनीता लोढीया, माजी महापौर संगीत अमृतकर, नगरसेवक निलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते के. के. सिंग, जिल्हा अध्यक्ष किसान सेल रोशन पचारे, पवन अगदारी, राजू रेड्डी, महिला अध्यक्षा सुनीता अग्रवाल, माजी नगरसेविका वंदना भागवत, अनुताई दहेगावकर, अश्विनी खोब्रागडे, राजेश अडूर, भालचंद्र दानव, भजन तपासे, नरेंद्र बोबडे, सुनील पाटील, शालिनीताई भगत, नवशाद शेख, इरफान शेख, कुणाल चहारे, राज यादव, केतन दुरसेलवार, चंदा वैरागडे, अनिता चवरे, संगपाल तावडे, जितेश दुर्योधन, पायल दुर्गे, वंदना गेडाम, वंदना बेले, विजया गेडाम, शालू गेडाम, सुरेश गोळेवार, कुणाल रामटेके यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेला भारत अखंड, एकसंध ठेवण्याची ताकद संविधानात आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांताच्या नागरिकांना एकजूट ठेवून त्यांच्या मनात एकता, समता, बंधूतेचा विचार रुजवणं संविधामुळेच शक्य झालं आहे. सर्वधर्मसमभाव, मानवतावाद संविधानाचा गाभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व संविधानामुळेच अबाधित आहे. त्यामुळे सर्वांनी भारताच्या संविधानाबाबत साक्षर होण्याची गरज असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment