पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डाॅ.अंकुश आगलावे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. अंकुश आगलावे यांच्या वरोरा येथील निवासस्थानी स्त्री शक्ती सन्मान व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
व्दारका नगरी, वरोरा येथील सेंट ॲनेस कॉन्व्हेंटच्या मागे असलेल्या डाॅ. आगलावे यांच्या निवासस्थानी आयोजित या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, श्री. गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरूकुंज मोझरीचे अध्यक्ष रवीदादा मानव, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, जि. प. अध्यक्षा संध्या ताई गुरनुले, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जि. प. सदस्या अर्चनाताई जीवतोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सत्कार समारंभाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या व्यक्ती, महिला बचतगट, सरपंच, श्री. गुरूदेव सेवा मंडळ प्रचारक, गुणवंत विद्यार्थी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, भारतीय सैन्यदलात सेवा देणारे वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी यांचा ग्रामगीता व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ.अंकुश आगलावे यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. आगलावे यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment