Ads

जय श्रीराम मंदिर विद्यानगर (कुर्झा)ब्रम्हपुरी तर्फे रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन.

ब्रम्हपुरी :-
येथील कुर्झा वार्ड विद्यानगर येथील युवक एकत्रित होऊन राम मंदिर ची निर्मिती केली परंतु येथील युवकांनी लोकांसमोर आदर्श निर्माण करत मूर्तिपूजेसह मानवसेवेला महत्व देत विविध समाजउपयोगी उपक्रम राबवित आहेत याच कार्याचा एक भाग म्हणून गरीब व गरजूना रक्ताचा तुटवडा भासू नये व गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे रक्ताच्या तुटवड्यामुळे कोणाला जीव गमवावा लागू नये या उदात्त हेतूने जय श्रीराम मंदिर विद्यानगर (कुर्झा वार्ड) ब्रह्मपुरी तर्फे 06/11/2021 शनिवार ला खास दीपावली शुभपर्वावर, जीवन ज्योती ब्लड बँक ब्रह्मपुरी व स्वप्नपूर्ती रक्त सेवा विद्यानगर कुर्झा यांच्या वतीने "रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले .
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित नियोजित पाहुण्यांसमक्ष कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जय श्रीराम मंदिर समितीचे सदस्य श्री सुभाष माहोरे यांनी ' रक्तदान हा शब्द बोलायला खूप सोपा आहे पण किती जण आपले कर्तव्य पार पाडत असतील...? असा भावनिक प्रश्न मांडला तर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी "रक्तदान सर्वश्रेष्ठ दान" असल्याचे सांगत उपस्थितांना त्याचे महत्त्व पटवून दिले.

वार्डातील दोनशे पलीकडील नागरिकांनी रक्तगट तपासणी कार्यक्रमादरम्यान आपले रक्तगट जाणून घेतले तर 20 ते 60 वयोगटातील तीस नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले त्यात प्रथम रक्तदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती सदर रक्तदान शिबीर कार्यक्रमाला हितायु लोकसेवा बहुउद्देशीय संस्था ब्रह्मपुरी तर्फे विशेष सहकार्य लाभले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment