Ads

हायवा ट्रकने युवकास चिरडले ..

The youth was crushed by the highwa truck
चंद्रपूर :-अष्टभुजा वॉर्डातून चंद्रपूर शहरात दुचाकीने येत असताना मागून येणाऱ्या कोळसा कंपनीच्या एका हायवा ट्रकने समोरील दुचाकीस्वारास चिरडले. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावरील रोमा बार, शिव मंदिरासमोर आज सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. राजकुमार सोनकर (38) रा. अष्टभूजा वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृतक राजकुमार हा वाहन चालकाचे काम करीत होता. तो सकाळी दुचाकी क्रमांक एमएच 34 बीएल 0704 क्रमांकाच्या वाहनाने जात असताना मागून येणा-या हायवा ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 0852 ने राजकुमारला जोरदार धडक दिली. यात तो वाहनाखाली चिरडल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी हायवा ट्रक चालकाला पकडले. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. दरम्यान या मार्गावर नेहमीच अपघात होत आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. त्यामुळे काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रामनगर पोलिसांनी संतप्त जमावाला शांत केले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी ट्रक चालक नारायण मडावी यास अटक केली आहे.
या मार्गावर भरधाव वाहनांच्या धडकेत होणा-या अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment