घुग्घुस :- प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घूस समोर मागील काही महिन्यांपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहे. याची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा नगरपरिषद कार्यालय घुग्घूस, ए. सी. सी. सिमेंट कंपनी घुग्घूस, आय. वि.आर. सी. एल. टोल नाका चंद्रपूर यांना मागील ५ महिण्यान पासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा या खड्ड्यांची अजूनपर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही. घुग्घूस शहरामध्ये येण्याचा हा मुख्य मार्ग असून प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरच मोठ्या प्रमाणामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे रुग्णालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना विशेषतः गरोदर मातांना या खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे परंतु आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा दिनांक २१/०७/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले होते परंतु यावर प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक २४/११/२०२१ रोजी परत निवेदन देण्यात आले परंतु प्रशासनाला मात्र जाग आली नसल्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा प्रशासनाला जाग आणण्याकरिता दिनांक १६/१२/२०२१ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घूस समोर आंदोलन स्वरुपी रांगोळी स्पर्धा आम आदमी पार्टी घुग्घूस शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले असून घुग्घूस शहरातील समस्त नागरिकांना या आंदोलन स्वरुपी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी केले
यावेळी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी,सागर बिऱ्हाडे,दिनेश पिंपलकर, निखिल कामतवार , सारंग पिदुरकर, सोनू शेट्टियार, स्वप्नील आवळे, अभिषेक तालापेल्ली उपस्थित होते.Aam Aadmi Party (AAP) organized a rangoli competition in front of the Primary Health Center to protest against the negligence of the administration.
0 comments:
Post a Comment