Ads

एस टी कामगारांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणार

In case of harm to the lives of ST workers, a case of manslaughter will be filed against the officers - announcement of the employees

चंद्रपूर The chandrapur times News : आम्ही महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ चंद्रपूर विभागातील चालक, वाहक यांत्रीक, लिपीक या पदावर काम करीत असून रा.प. महामंडळाचे हे एक कुटुंब आहे. आर्थिक विवचनेतून आमच्या कुटुंबातील 49 बांधवांनी आत्महत्या केले आहे त्यामुळे आम्ही सर्व कुटूंबीय मानसिक तनावात व दुखवटयात असुन आमची व आमच्या कुटूंबाची मानसिकता पूर्णपणे खचलेली आहे. यातून आमच्या आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना सावरण्यासाठी 49 आत्महत्याग्रस्त असलेल्या कुटुंबाचे सातवन करण्याचे असल्याने आम्ही कर्तव्यावर हजर राहु शकत नाही.

चंद्रपूर विभागातील चालक वाहक यांत्रीक लिपीक व सर्व कर्मचारी दुखवटयात असताना कर्मचा-यावर निलंबण, सेवासमाप्ती व बदली आदेश देणे आरोपपत्र देणे समक्ष सुनावणी लावणे व रोजंदार कर्मचाऱ्याच्या सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी धमकी देणे अशा प्रकारच्या कठोर कार्यवाही विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी आगार व्यवस्थापक, उप यंत्र अभियंता, सुरक्षा व दक्षता अधिकारी विभागीय सांख्यिकी अधिकारी करीत आहे.

कामगार न्यायालयामार्फत जो पर्यत दुखवटा बेकायदेशिर घोषित होत नाही तो पर्यंत विभाग नियंत्रक, विभागीय वाहतुक अधिकारी, आगार व्यवस्थापक, उप यंत्र अभियंता सुरक्षा व दक्षता अधिकारी, विभागीय सांख्यिकी अधिकारी यांनी केलेल्या कारवाया बेकायदेशिर ठरतात.

मा. उच्च न्यायालयाने आमचा दुखवटा हा पूर्णपणे कायदेशिर असा ठरविलेला आहे आम्ही सर्व कामगार हा दुखवटा अत्यंत शांतपणे पाळत आहोत त्यामुळे आमच्यावर केलेली कार्यवाही ही बेकायदेशीर अन्यायकारक व न्यायालयाचे अवमान करणारी आहे.

मा उच्च न्यायालय, मुंबई येथे संदर्भात केस क 21699 / 2021 यावर प्रोसिडींग सुरू आहे. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही असे असताना विभाग नियंत्रक विभागीय वाहतुक अधिकारी आगार व्यवस्थापक उप यंत्र अभियंता, सुरक्षा व दक्षता अधिकारी विभागीय सांख्यिकी अधिकारी यांनी केलेली कार्यवाही बेकायदेशिर आहे. वरील सक्षम प्राधिकारी यांनी केलेल्या बेकायदेशीर कार्यवाहीमुळे चंद्रपूर विभागातील पाच कर्मचा-याची प्रकृती खालावली असून त्याच्यावर औषयोपचार सुरु आहे.

आजपर्यंत चंद्रपूर विभागाच्या 94 कामगारांच्या सेवासमाप्तीचे आदेश निर्गमित झाले असून जवळपास 100 कामगार निलंबित झाले आहेत व 47 कामगारांची बदली करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या दडपशाहीच्या भूमिकेमुळे अनेक कामगार आजारी पडत असून अनेकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे,

चंद्रपूर आगाराचे चालक सब्बीर खान यांना अधिकाऱ्यांच्या दबावामुळे तसेच कामगारांवर होत असलेल्या कार्यवाही मुळे हृदयविकाराचा झटका आला असून ते सी.एच.एल. डॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात मागील 6 दिवसापासून उपचार घेत असून त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्याच्या जिविताचे काहिही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी चंद्रपूर विभागीय कार्यालयातील व चंद्रपूर आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर राहील व त्यानुसार प्रसगी त्याच्याविरूद्ध कायदेशीर कार्यवाहीचा पर्याय खुला राहिल सतत होणाऱ्या निलंबन सेवासमाप्ती व बदल्यांच्या कारवाह्यामुळे दुखवटयात सामिल सर्वच चंद्रपूर विभागातील कामगार प्रचंड मानसिक दबावात असून या दबावामुळे कर्मचाऱ्यांचे काही बरेवाईट झाल्यास तसेच त्याची तब्येत बिघडली हृदयविकाराचा झटका आला किवा विष प्राशन आत्महत्या किवा कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी श्रीमती स्मिता सुतावणे विभाग नियंत्रक कु रंजू घोडमारे विभागीय वाहतुक अधिकारी श्री. सचिन बा डफळे आगार व्यवस्थापक, श्री. चंद्रभूषण घागरगुडे उप यंत्र अनियता, मोहन कानफाडे, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. राकेश तलमले विभागीय सांख्यिकी अधिकारी राम चंद्रपूर इत्यादी जबाबदार राहतील, दुखवटा मोडीत काढण्याच्या उद्देशाने अधिका-यानी वेगवेगळे मार्ग शोधून काढले असून त्यानुसार बदली निलंबन व रोजदारी कामगाराची सेवासमाप्ती यासारख्या कार्यवाडया करूनही कामगारांची एकता कायम असल्याने बिथरलेल्या अधिकाऱ्यांनी षडयंत्र करून कामगार नेत्यावर खोटे आरोप करून त्यांना तुरूंगात डांबण्यात आले असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment