Ads

आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या.


Allow us to die voluntarily
आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या
चंद्रपूर (प्रतिनिधी):- तब्बले २ महिन्यांपासून सुरू संपकरी असलेल्या एसटी कामगारांच्या संपावर सरकारने अजुनही तोडगा काढला नसून उलट कामगारांवर कारवाई करून राज्यसरकार दमनकारी नीती अंगीकारत असल्याने अखेर आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन संपकरी एसटी कामगारांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे. सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर आगारातून सुरू झालेल्या कामगारांच्या संपाला जवळपास २ महिने होत असुन संपुर्ण राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा दीपस्तंभ चंद्रपुर विभागीय आगार ठरत असल्याचे चित्र आहे. ह्या संप काळात होणाऱ्या जवळपास सर्व आंदोलनाची सुरुवात चंद्रपूर केल्याचे विभागीय आगारातून झाली असुन राज्यात एस टी कामगारांवर होणाऱ्या प्रत्येक कारवाईची सुरवात देखील चंद्रपूर विभागीय आगारातून होत आहे. राज्यात सर्वप्रथम निलंबनाचे आदेश असो की बडतर्फीचे आदेश अथवा बदलीची सर्वच कारवाई चंद्रपूर विभागीय आगाराने सर्वप्रथम केल्याचे आढळून आले आहे.

कामगारांनोनी दिलेल्या निवेदनाचा स्विकार अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर ह्यांनी केला असुन ह्यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून शाहेस्ता साहिल, ललिता अहिरकर, अमोल पडगेलवार, गजानन भवणे, दिनदास चामाटे, अजाबराव मेश्राम, संजय पटले, सौरभ हिंगमिरे, निखारे, अमृत किंनाके, अरविंद धोटे, प्रकाश फटिंग, राजु दांडेकर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment