घुग्घुस :- सोमवार 6 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत नवनिर्मित ग्रामीण रुग्णालय, घुग्घुस ईमारत भूमीपूजन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उदघाटक मा.ना.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन ( महाराष्ट्र शासन ) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.श्री. किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख उपस्थिती मा. डॉ. मिताली सेठी (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. एन. बी. राठोड जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.पी. गहलोत मंचावर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना ना. विजय वडेट्टीवार म्हणाले यावर्षी आम्ही ग्रामीण रुग्णालयास पैशे दिले आता दोन कोटी रुपये दिले रुग्णालयास पैश्याची कमी पडू देणार नाही तसेच डॉक्टर व नर्स यांच्या निवासस्थाना साठी 10 कोटी उपलब्ध करून देऊ तर आमदार किशोर जोरगेवार म्हणाले घुग्घुसच्या विकासाकडे आमचे लक्ष आहे. घुग्घुसच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार.
यावेळी काँग्रेस नेते लक्ष्मण सादलवार, जयंता जोगी, शेषराव ठाकरे, जावेद सिद्दीकी, शोभाताई ठाकरे, गणेश उईके, शेखर तंगलपेल्ली, अशपाक शेख, किरण पुरेल्ली, अनिरुद्ध आवळे, शहजाद, शेख, यंग चांदा ब्रिगेडचे इम्रान खान, स्वप्नील वाढई, उषा आगदारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment