ब्रम्हपुरी :- जिल्हा चंद्रपूर येथील ब्रह्मपुरी या तालुक्यातील खेडी गावात वडसा देसाईगंज येथील सुप्रसिध्द अश्या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
या धान उत्पादक क्षेत्रात झाडीपट्टीतील लोक कलेला अनन्य महत्त्व असुन स्थानिक गावकरी संपूर्ण परिवारासह रात्रभर या मनोरंजनाचा आस्वाद घेतात.
या नाटकाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्याचा मान मला आयोजक माझे सहकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री अश्विन उपासे ह्यांनी दिल्याबद्दल मी आभारी आहे.
यावेळी ब्रम्हपुरी तालुका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माझा शाल, श्रीफळ व विठ्ठलाची मुर्ती भेट देत प्रेमपूर्वक सत्कार केला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री. मोंटू भाऊ पिल्लारे, तालुका अध्यक्ष श्री. वासुदेव सौंदळकर,
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिमूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत भाऊ घुमे, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष अश्विन भाऊ उपासे, चंद्रपूर तालुका अध्यक्ष राहुल भाऊ उपरे, मुल तालुका अध्यक्ष समीर भाऊ अल्लुरवार, शहर अध्यक्ष पराग भाऊ बनपुरकर, भद्रावती शहर कार्याध्यक्ष सूरज भाऊ भेले, बंटी भाऊ मेश्राम, पवण भाऊ मेश्राम, स्थानिक ग्रामपंचायत सरपंच गजानन नवलाखे, आदेश मालोदे, सूरज बाणारकर उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment