चंद्रपुर :-चंद्रपूर शहर महानगरपालिकेला जिएफसी (कचरामुक्त शहर) मध्ये यावेळी 3 स्टार मानांकन मिळाले.हे मानांकन म्हणजे महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी व कंत्राटी कामगारांचे यश आहे.परंतु स्वच्छता कर्मचारी व कामगारांच्या मेहनतीला महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वाची प्रामाणिकपणे जोड मिळालेली नाही. महापौर आणि आयुक्त यांचे संपूर्ण लक्ष घोटाळे करून पैसे कमावण्यात तसेच घोटाळेबाजांना संरक्षण देण्यामध्ये लागलेले आहे. त्यामुळे मागच्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रात क्रमांक 1 वर असलेली महानगरपालिका यावर्षी क्रमांक 2 वर आलेली आहे. तसेच महानगरपालिकेला 5 स्टार मानांकनापासून वंचित राहावे लागले आहे. मनपाला यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक व कचरामुक्त शहराच्या मानांकनामध्ये 3 स्टार मिळाल्यामुळे स्वच्छता कर्मचारी व कामगार सुपरस्टार ठरले. मात्र पाहिजे तशी मदत प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून या स्वच्छता कर्मचारी-कामगारांना मिळालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेने ठराव घेऊनही 5 स्टार मानांकन मिळवता आले नाही.स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर घसरण झालेली आहे. यासाठी आयुक्त व महापौर जबाबदार आहेत.
स्वच्छता कर्मचारी व कामगार सुपस्टार असले तरी महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते फ्लाॅप स्टार आहेत.एका अर्थाने स्वच्छता कर्मचारी व कामगार पूर्णपणे पास झालेले आहेत. मात्र चंद्रपूर महापौर व आयुक्त नापास झालेले आहेत.नापास झालेल्या महापौर व आयुक्त पास झाल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून,फलकबाजी करून खोटा सन्मान मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. असे केल्याने सामान्य चंद्रपूरकर त्यांचे घोटाळे विसरणार नाहीत. महापौर व आयुक्तांना त्यांच्या घोटाळ्यांचे परिणाम निश्चितपणे भोगावे लागतील.
2019 ला 3 स्टार रेटिंग च्या परीक्षेत मनपा पास ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने 3 स्टार कचरामुक्त शहराची रेटिंग मिळण्यासाठी दिनांक 30. 10.2018 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक 56 ला सर्वानुमते मंजुरी दिली. शहराला 3 स्टार रेटिंग साठी स्वयंघोषित करण्याचा ठराव यावेळी सर्वानुमते घेण्यात आला. 2019 मध्ये 3 स्टार रेटींग मिळविण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात आला व त्यानंतर झालेल्या सर्वेक्षणामध्ये महानगरपालिकेला 3 स्टार मानांकन देण्यात आले. यावेळी महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळाला होता.
2020 मध्ये 5 स्टार रेटिंग च्या परीक्षेत नापास
मनपाच्या दिनांक 31.8.2019 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक 19 ला मंजुरी देऊन चंद्रपूर शहराला 3 स्टार व सातत्यपूर्ण सेवास्तर प्रगतीनुसार 5 स्टार कचरामुक्त शहराच्या रेटींगसाठी स्वयंघोषित करण्याचा ठराव घेण्यात आला.यानंतर एका चमूने
शहराचे 5 स्टार करिता सर्वेक्षण सुद्धा केले.मात्र काही बाबतीत मनपा कमी पडल्याने गुण कमी मिळाले व 5 स्टार रेटिंग मिळण्याची संधी हुकली.मागील वर्षी प्रमाणे 3 स्टार रेटींगवर समाधान मानावे लागले.तसेच स्वच्छ सर्वेक्षणा मध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर मनपाची घसरण झाली.एका अर्थाने मागच्या वर्षी तीन स्टार मध्ये पास झालेली मनपा यावर्षी 5 स्टार च्या रेटिंगसाठी नापास झाली. स्वच्छता कर्मचारी व कामगार यांना मनपातील सत्ताधारी व प्रशासनाची योग्य मदत न मिळाल्याने मनपा 5 स्टार रेटींग मध्ये नापास झाली. एका अर्थाने महापौर व आयुक्त नापास झाले. मात्र जनतेची दिशाभूल करून मेरिटमध्ये आल्याचा आव महापौर व आयुक्त करीत आहे अशी प्रतिक्रिया नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिलेली आहे.
0 comments:
Post a Comment