सावली प्रतीनिधी:-रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनीष्ठ कला महाविद्यालय आणि माऊंट विज्ञान महाविद्यालयाचे वतीने महामानव,विश्वरत्न,प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महारिनिर्वान दिन ६ डिसेंबरला संपन्न करण्यात आला याप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि शांतीदूत तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतीमांना संस्थाध्यक्ष के.एन.बोरकर , संस्था सचिव . विशाखा.सी.गेडाम यांचे हस्ते पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संचालक बि.के.गोवर्धन,सौ.चंद्रभागाबाई गेडाम .डी.बी.गोवर्धन .वि.के.बोरकर यु.एम.गेडाम माजी संचालक रा.का.गेडाम एच.जे.दुधे संस्थेचे हितचिंतक मान.भुवनेश्वर बोरकर,सावली येथील प्रतीष्ठीत मान्यवर,मुख्यमार्गदर्शक डाॅ.विठ्ठलराव चौथाले इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येणापूर, महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एल.शेडे, पर्यवेक्षक एम.डी.लाकडे, माऊंट विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य पी.जी.रामटेके,सर्व प्राध्यापक वर्ग,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महामानव डॉ. बाबासाहेब यांचे विचार,आणि त्याग,परीश्रम, विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावेत आणि त्याचा आदर्श अंगीकारावा या उदात्त हेतूने विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा,गीतगायन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.विद्यालय तथा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने उस्पूर्त सहभाग घेऊन बाबासाहेबांच्या विचारांची देशाच्या प्रगतीसाठी आवश्यता आहे मोठ्या आवेशात पोडतीडकीने मांडले,मुख्य मार्गदर्शक विठ्ठलराव चौथाले मार्गदर्शन करतांना म्हणाले की,महामानवासारखा आजचा विद्यार्थी शोधूनही सापडणार नाही परंतु बाबासाहेबांचे कठोर परिश्रम,जिज्ञासू वृत्ती,आणि आपले ध्येय निश्चित करुन वाटचाल केली तर आपल्या प्रगतीपासून कोणीही रोखु शकत नाही.आपणच आपल्या प्रगतीचे शिल्पकार आहात असा मौलीक सल्ला दीला.
विविध स्पर्धेमध्ये क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिल्ड, प्रमाणपत्र व रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले.
श्रध्दांजलीपर कार्यक्रमाचे संचलन प्रा.पी.एन.कन्नाके सर,कु.सि.एस.रायपूरे यांनी केले.आणि विद्यालय तथा महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एम.डी.लाकडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अध्यापक,अध्यापीका, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment