Ads

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विद्यार्थांना स्पर्धा परिक्षांचे पुस्तक वाटप.

On the occasion of MLA Kishor Jorgewar's birthday, Guardian Minister Vijay Vadettiwar distributed books of competitive examinations to students
चंद्रपुर :-
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात एमपीएससी व युपीएससीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा पूस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मदत व पूनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कॉंग्रेसचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी महापौर संगीता अमृतकर, नगर सेविका सुनिता लोढीया, प्रदेश कॉंग्रेसचे कमिटीचे शिवा राव, सचिन कत्याल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणा-या शुभेच्छुकांनी पूष्पगुच्छ ऐवजी एमपीएससी किंव्हा युपीएससी ची तयारी करणारी पुस्तके भेट स्वरुप द्यावी असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते. त्यामूळे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या शुभेच्छुकांनी सदर पुस्तक मोठ्या प्रमाणात भेट स्वरुपात देण्यात आलीत. या पुस्तकांचा वितरण सोहळाही आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सदर स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment