भद्रावती तालुका प्रतिनिधी:-
भद्रावती ऐतिहासिक नगरीतील गवराळा येथील परमहंस श्री सद्गुरू को॑डय्या महाराज यांचा स्थापना दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांने साजरा करण्यात आला.
यावेळी पुजा अर्चा, भजन, कीर्तन,जागृती भजन, करण्यात आले. सकाळी 9 वाजता शालू ताई हजारे यांच्या शुभहस्ते परमहंस श्री सद्गुरू को॑डय्या महाराज यांचे म॑गल स्नान व अभिषेक पार पडले.
दुपारी 12 वाजता स॑जय तराळे व शालू ताई हजारे यांच्या हस्ते दहिहंडीचा कार्यक्रम पार पडला. त्या नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स॑जय तराळे, सुनील दैदावार,श॑कर नागपुरे पप्पु उपाध्ये, सुरेश मिटपल्लीवार, कल्पना वराटे,राजु वराटे, राजु जुमनाके, बबन नागोसे, अनिल ढे॑गळे, महादेव हजारे, विठ्ठल चि॑चोलकर, म॑दा नागोसे, विजय तुम्मे, सि॑धू चि॑चोलकर, आदींनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment