चंद्रपूर/ प्रतिनिधी :-देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टरअपघातात निधन झाल्याने देश शोककळेत बुडाला आहे. असे असताना प्रसिद्धीसाठी चमकोगिरी करणाऱ्या चंद्रपूरच्या आमदाराने गुरुवारी मोर्चा काढून आपल्या आणखी एका स्टंटबाजीची प्रचिती दिली. प्रसिद्धीसाठी वाटेल ते करणाऱ्या या आमदाराने खोटी आश्वासने देऊन चंद्रपूरच्या नागरिकांची दिशाभूल केली. हे प्रकाशाएवढे सत्य असून, या आमदाराची आता बत्ती गुल झाली आहे. त्यामुळे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी मनपाच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोर्च्याची स्टंटबाजी सुरु केली आहे.
देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टरअपघातात निधन झाल्याने शासकीय दुखवटा आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे सर्व महत्वपूर्ण कार्यक्रम रद्द झाले. असे असतानादेखील या दुःखद प्रसंगी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आता. अपघातात प्राण गमावलेल्यांप्रति मानवी संवेदना जागृत ठेवून हा मोर्चा स्थगित करायला हवा होता. मात्र, चंद्रपूरच्या आमदाराने असंवेदनशील कृती यातून दाखवून दिली आहे. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी न घडलेल्या घोटाळ्याचा बाऊ करून पब्लिसीटी स्टंट करण्यात येथील आमदार वस्ताद असल्याचे दिसून येत आहे.
0 comments:
Post a Comment