भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी शासकीय यंत्रणा कामाला लावणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा भद्रावती शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांंना निवेदन पाठविण्यात आले.
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकीत निवडून आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे. कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणत ऊर्जा मंत्र्यांच्या वतीने धमकावले जात आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहे. ही बाब निंदनीय व लज्जास्पद आहे.
सरकारी पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कारण्यात आली.
सदर प्रकार अतिशय गंभीर असून अश्याच एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना पदापासून दूर व्हावे लागले होते. सदर विषयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याविषयी त्वरित कार्यवाही संदर्भात विनंती करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सदर निवेदन भाजयुमो चे प्रदेश उपाध्यक्ष अमित गुडांवार
भाजयुमो चे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांच्या नेतृत्वात
विशाल ठेंगणे,श्रीपाद भाकरे,प्रदीप लोणकर ,तेजस कुभांरे,सुनिल बोरकुटे,चेतन स्वान,शिवा कवादार,विक्रम सिंग,शिवा पांढरे,गणेश पारधे,महेश मेश्राम याच्या सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment