सलेल्या घरफोडी, चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते, त्यानुसार गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. बाळासाहेब खाडे यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. दि. ०१/११/२०२१ रोजी पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली चंद्रपुर डिव्हीजन पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे घरफोडी रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवीत असतांना गोपनीय माहितीव्दारे पोस्टे बल्लारशाह परिसरात गोल पुलीया येथे सापळा रचून पो.स्टे बल्लारशाह रेकॉर्ड वरील विसबा गुन्हेगार यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने चार साथीदारासोबत चंद्रपुर येथील गंज वार्ड येथे एक गोदामातुन ३२ तेलाचे पिपे चोरी केल्याचे सांगीतले त्याचेकडुन ११ वेगवेगळया कंपनीचे तेलाचे पिपे, गुन्हयात वापरलेली दोन मोटारसायकल दोन मोबाईल असा एकुण १,१४,८६०/-रू चा माल हस्तगत केला आहे.
तसेच पोस्टे रामनगर परिसरात बंगाली कॅम्प येथे काहि दिवसापुर्वी एका इसमाचे गळयातील सोन्याची चैन व मोबाईल चोरी करणारा नेहरू नगर येथील एक आरोपी नामे संभा कुंडलीक पोटे वय २६ वर्ष यास ताब्यात घेवून त्यांचेकडुन ७ ग्रॅम सोन्याची चैन व एक मोबाईल असा एकूण ४५,०००/- रु चा माल हस्तगत करण्यात आला.
तसेच पोस्टे दुगीपार जि गोंदिया येथील मौजा सोंदड परिसरात रात्रोला एक घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून घरातील एक एच.पी कंपनीचा लॅपटॅप व चांदीचे दागीने चोरी करून चंद्रपुर येथील दुर्गापुर परिसरात लॅपटॅप विकण्यासाठी फिरत असल्याने एका विसबा यास ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एच.पी कंपनीचा लॅपटॅप कि ५०,०००/- रू चा माल हस्तगत करून पोस्टे दुगीपार जि गोंदिया याचें ताब्यात देण्यात आले.
वरील प्रमाणे पोस्टे चंद्रपुर शहर, रामनगर, दुगीपार जि गोंदिया येथे चोरी घरफोडी करणारे ४ विसबा व ३ आरोपी यांचेकडुन एकुण २,०९,८६०/- रू चा माल हस्तगत केला.
मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा.. मा. अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सा. यांचे मार्गदर्शना खाली बाळासाहेब खाडे पोनी स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात पोउपनी संदीप कापडे पोहवा संजय आतंकुलवार बनं. २२१५, पो.शि. नितीन रायपुरे ब.नं. २५४९, पो.शि. गोपाल आतकुलवार, पो.शि. कुदनसिंग बावरी बनं. २९४९, पो.शि. प्रांजल झिलपे ब.नं. २९४८, पो.शि. रविंद्र पंधरे ब.नं. १५५८, म.पो. शि. अपर्णा मानकर बनं. २८३५ यांनी यशस्वी कामगिरी बजावली.
0 comments:
Post a Comment