चंद्रपूर :- तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे, त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा, त्यासाठी त्यांना सुरक्षेची हमी मिळण्याकरिता घर बांधण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेतला आहे.
तृतीयपंथी बांधवांना खासदार बाळू धानोरकर हे स्वखर्चातून चंद्रपूर येथील रय्यतवारी कॉलनी येथे घर बांधून देणार आहे. आज त्यांच्या घराचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, माजी नगरसेवक राजेश अडूर, इंटक जिल्हाअध्यक्ष प्रशांत भारती, अशोक मत्ते, साजन बहुरिया, करिष्मा, बिपाशा, पायल, स्वीटी, रामकृपाल यादव, ताजुद्दीन शेख, महिंद्र अडूर, प्रवीण अडूर, अज्जू कलवल, इंदर गुप्ता, प्रिंस बावरे, सुलतान अली यांची उपस्थिती होती.
याआधी देखील खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नेहमी वंचित घटकासाठी काम केले आहे. समाजातील सर्वात वंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांनाही मुख्य प्रवाहात येता यावं आणि त्यांनाही सन्मानच जीवन जगता यावं म्हणून त्यांनी तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्या केवळ मागणी करून थांबल्या नाहीत तर स्वतःच्या घरी त्यांनी तृतीयपंथीयांसोबत दिवाळी साजरी करून नवा आदर्शहि घालून दिला होता. आता त्यांना हक्काचे घर बांधून देताना भूमिपूजन करत असताना तृतीयपंथी बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला होता.
इथेच न थांबता यापुढे देखील अश्याच प्रकारे तृतीय बांधवांच्या समस्या दूर करण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.
0 comments:
Post a Comment