भद्रावती,दि.२५(तालुका प्रतिनिधी):-
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 53 व्या पुण्यतिथी निमित्त संपन्न झालेल्या परिसंवाद स्पर्धेत एकूण 30 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यामध्ये महाविद्यालय विभागात प्रथम क्रमांक संकेत जमदाडे आ य. टी.आई. प्रशिक्षणार्थी, द्वितीय क्रमांक रुचिता बचाटे लोकमान्य विद्यालय भद्रावती तसेच अनुक्रमे तृतीय क्रमांक प्रतीक्षा नन्नावरे, चतुर्थ क्रमांक प्रतिक लाडे, पाचवा क्रमांक सीमा पाल लोकमान्य विद्यालय भद्रावती यांनी क्रमांक पटकावीला. तसेच माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक लीना निळे कर्मवीर विद्यालय भद्रावती, द्वितीय क्रमांक दीक्षा दुधलकर, हिरालाल लोया विद्यालय वरोरा ,तृतीय हर्षदा आखाडे लोकमान्य विद्यालय भद्रावती, चतुर्थ क्रमांक महिमा झाडे हिरालाल लोया विद्यालय वरोरा,पाचवा क्रमांक तनश्री बोधाने ग्रामविकास विद्यालय, पाटाळा तर पूर्व माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक मनस्वी कुत्तरमारे सेंट अनस स्कूल भद्रावती, द्वितीय क्रमांक आर्या कुत्तरमारे सेंट अनस स्कूल भद्रावती, तृतीय क्रमांक आलिया पठाण जिल्हा परिषद उच्च प्रा.शाळा गवराळा, चतुर्थ क्रमांक पूजा नागभिडकर जिल्हा परिषद उच्च प्रा.शाळा गवराळा, पाचवा क्रमांक संजीवनी कांबळे जिल्हा परिषद उच्च प्रा.शाळा गवराळा,यांनी पटकाविला सर्व विजेत्यांना ग्रामगीता, रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
0 comments:
Post a Comment