घुग्घुस :- 23/12/2021 ला मुंबई टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग ची बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश प्रभारी श्री मनोज बागडी साहेब तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ भाऊ हत्तीअंबीरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व प्रदेश उपाध्यक्ष, सर्व समन्वयक, जिल्हाध्यक्ष यांना मागील तीन महिन्याचा कार्य अहवाल मागण्यात आले.
म्हणून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष पवन कुमार आगदारी मुंबई येथे बैठकीत उपस्थित राहून तीन महिन्यांचा अहवाल सादर केले तसेच येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त अनिसूचित जातींचे पदाधिकारी व कार्यकर्ताना संधी द्यावे असे प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ भाऊ हत्तीअंबिरे साहेब व प्रदेश प्रभारी श्री मनोज भाऊ बागडी साहेब यांना सुचवले.
0 comments:
Post a Comment