Ads

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे स्वागत


On behalf of the Young Chanda Brigade, Welcome to the Rathyatra of shree Sant Shiromani Santaji Jagannade Maharaj
चंद्रपुर :-
श्री संत शिरोमणी संताजी जगणाडे महाराज यांच्या रथयात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले. यावेळी रथयात्रेत सहभागी झालेल्या तैलिक समाज बांधवांच्या चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, वर्धा लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार रामदार तळस, कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगर सेवक नंदु नागरकर, विदर्भ तैलिक समाजाचे अध्यक्ष बबनरावजी फंड, माजी महापौर संगीता अतृतकर, वासुदेव देशमूख, अजय वैरागडे, सुरेश वैरागडे, रामदार बानकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ प्रमुख राशेद हुसेन, तापूष डे, विमल कातकर, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

तैलिक समाज घडविणारे तेली समाजाचे आराध्यदैवत, समाज सुधारक संत शिरोमणी संताजी जगणाडे महाराज यांच्या रथयात्रेचे आज तैलिक समाज बांधवांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. दरम्याण सदर रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयासमोर पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी रथयात्रेचे स्वागत केले. यावेळी श्री. संत संताजी जगणाडे महाराज यांच्या प्रतिमेला व चरण पदूकाला पूष्पहार अर्पण करत त्यांना नमन केले. सदर रथयात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांच्या चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment