Ads

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत चेहरा! - जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे


Atal Bihari Vajpayee is a cultured face in Indian politics! - District President Devrao Bhongale
घुग्घुस :- शनिवार, दि. २५ डिसेंबर.
देशाचे माजी पंतप्रधान, श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात आजचा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेहस्ते अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्थानिक जेष्ठ पदाधिकारी महिकाली राजन्ना, पूनम शंकर, वासुदेव ठाकरे, शैलेंद्र कक्कड, निलकंठ नांदे आणि मंदेश्वर पेंदोर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रमिक बांधवांसाठी केंद्र सरकारतर्फे मोफत देण्यात येत असलेल्या श्रमिक कार्डचे श्रमिकांना वाटप करण्यात आले. यासोबतच श्रद्धेय अटलजींच्या “क्या हार में, काय जीत में, किंचित नहीं भयभीत में” या कवितेचे याठिकाणी वाचन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी हे देशाचे सर्वमान्य नेते होते. पंतप्रधान म्हणून देशाच्या निर्णयप्रक्रियेत, विकासप्रक्रियेत सर्वांना सहभागी करुन लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. अटलजींच्या माध्यमातुन भारतीय राजकारणाला सुसंस्कृत चेहरा मिळाला. देशातील सर्व धर्म, पंथ, प्रांताच्या बंधु-भगिनींच्या मनात विश्वास निर्माण करणारे अटलबिहारी वाजपेयी जी आदर्श राजकारणी होते. त्यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. आणि आता मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील “अटलजी ते मोदीजी” असा विकासाचा आलेख वृद्धिंगत होतो आहे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले. यासोबतच त्यांनी मोदी सरकारच्या सात वर्षीय लोकहिच्या निर्णयांची, विविध योजनांची उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी जि. प. सभापती नीतू चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, संजय तिवारी, साजन गोहणे, सिनू इसारप, बबलू सातपुते, शरद गेडाम, अनिल मंत्रीवार, विनोद चौधरी, अनंता बहादे, महेश मुक्के, डोमाजी वानखेडे, श्रीधर तग्रवार, शिवम भारती, विजय ठाकरे, नितीन काळे, अशोक नागभीडकर, शंकर मिसाळा, वसंत भोंगळे,विनोद जंजर्ला, झिन्नु कामतवार, अरूण साठे, पियुष भोंगळे, रूक्मिदेवी यादव, तिरुपती कोंडागुर्ला, ज्योती बट्टे, सोनी कैथवास, अनिता श्रीवास, लैजा ठाकरे, सुमार सरोज, आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, लाभार्थी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment