चंद्रपूर :- संपूर्ण देशभरातून समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टी पर्पज को ऑप सोसायटी लि., सहारा, मैत्रेय, पल्स, एस. पी. एन. जी. पेअरलेस, एस.जे. एस. की रिच इन्फा डेव्हलपर्स, एच.बि.एन., पॅन कार्ड क्लब अशा अनेक इन्व्हेस्टमेंट कंपनीतून गुंतवणूकदारांच्या (आर.डी. एफ.डी. डेली कलेक्शन) फसवणूकी बाबतच्या घडामोडी •पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला माहितच आहे.
भारतातील लाखो मध्यमवर्गीय नागरीकांची यामध्ये झालेल्या फसवणुकीबाबत आज दि. २४/१२/२०२१ रोज शुकवारला भारतातील सहा राज्य व महाराष्ट्रातील ३५ जिल्हयातून मा. जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय ग्राहक संरक्षण मंच द्वारा निवेदन देण्यात आले व मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सुद्धा निवेदनाद्वारे कळविण्यात आले की, जिल्हयातील ४ ते ५ लाखाच्या वर गुंतवणूकदारांचा (आर.डी. एफ.डी. डेली कलेक्शन) समावेश आहे. वरील नमुद केलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी आपल्या कष्टातील मिळकतीमधुन बचतीसाठी काही भाग या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेला होता.
सदर केलेली गुंतवणूक ही (आर.डी. एफ.डी., डेली कलेक्शन) रक्कम जवळपास ४ ते ५ कोटींच्या वर आहे. भारत सरकारच्या कृषी तथा इतर मंत्रालयातर्गत या सर्व कंपन्या मान्यता प्राप्त झालेल्या होत्या. म्हणूनच जनतेनी यावर विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची मिळकत सदर संस्थांमध्ये गुंतविलेली होती. दरम्यानच्या काळात या संस्थांचे संस्थापक विविध गुन्हयाअंतर्गत तुरुगांत असल्यामुळे सरकारने या संस्थेवर प्रशासक लिक्विडेटरच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. सरकारचा हेतू असा होता की या प्रशसकाद्वारे गुंतवणूकदाराची रक्कम अदा करणे लवकरात लवकर शक्य व्हावे, परंतु प्रशासक सुध्दा संपगतीने काम करत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांची कुचबना होत आहे. अनेक लोकांच्या मुलांचे शिक्षण व लग्न यामुळे बाधित झालेले आहेत. बरेच लोक या गुंतवणुकीमुळे बेघर झालेले आहे. तसेच बरेच गुंतवणुकदारांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. करीता आम्ही आज या निवेदनाद्वारे आपले लक्ष्य या संदर्भात वेधत आहो मागील अनेक वर्षापासून जनतेला परतावा परत मिळण्याकरीता निवेदने कोर्ट केस व आंदोलने या सर्व पर्यायाचा वापर केल्या गेला. परंतू आजपर्यंत जनतेचा कुठलाही मोबदला परत मिळालेला नाही. आपल्या मार्फत शासन आणि प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आले. परंतू आजपर्यंत त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तेव्हा संपूर्ण भारतातील मा जिल्हाधिकारी यांना एकाच दिवशी एकाच वेळेला अखिल भारतीय पिडीत ग्राहक संरक्षण मंचाचे माध्यमातून निवेदने देण्यात येत आहे की, सदर विषयाकडे गांर्भीयाने लक्ष केंद्रीत करून तात्काळ सोडविण्यात यावा व जनतेला परतावा देण्याकरीता असे निवेदन देण्यात आले. तेव्हा भास्कर उभारे, धनराज कोवे, कमलकात कडस्कर, राजू नागपूर, अमोल येवले, संतोष बोमिडवार, संजय मोघे, प्रल्हाद वरखडे, संगिता ठाकरे, वर्षा लांडे, अर्चना बावणे, मदन उके, इंदिराबाई मानकर, चंद्रकला दुर्गे, किर्ती पांडे, रत्नाकर ठोंबरे, विभा बेहरे उपस्थित
होते.
0 comments:
Post a Comment