Ads

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवसी ग्राहक पंचायत तुकुम येथे नविन कार्यकारणी घोषित

New executive announced at Consumer Panchayat Tukum on National Consumer Day
भद्रावती तालुका प्रतिनिधी :-आज दि.२४ डिसेंबर २०२१
राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला आणि सोबतचं
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची नविन शाखा तुकुम, चंद्रपुर येथे स्थापन करण्यात आली.


२४ डिसेंबर १९८६ या दिवसी ग्राहक कायद्याला मंजुरी देण्यात आली. तेव्हा पासुन संपुर्ण देशात २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे. याचेच औचित्य लक्षात घेवुन अखिल भारतीय ग्राहक पंचायत तुकुम येथे नविन कार्यकारणी घोषित करण्यात आली.


अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तुकुम शाखेचे अध्यक्ष आण्याजी ढवस, उपाध्यक्ष उषाताई मेश्राम, सचिव प्रभात कुमार तन्नीवार, सह सचिव गोकुळदास पिंपळकर, संघटन मंत्री विजय चिताडे, कोषाध्यक्ष नानाजी सरोदे तर संपर्क प्रमुख पदी भास्कर इसनकर यांची नियुक्ति करण्यात आली.

नविन शाखा तुकुम, चंद्रपुर
हि श्री. पुरूषोत्तम मत्ते (जिल्हा संघटन मंत्री), श्री. वसंत वर्हाटे (जिल्हा सह संघटन मंत्री) यांच्या मार्गदर्शनात अशोक शेंडे (सचिव), प्रविण चिमुरकर (सह सचिव) यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
कार्यक्रम Covid-19 चे सर्व नियम पाळुन करण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment