जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
चिमूर तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाहनगाव च्या वनक्षेत्रात वाघाने हल्ला करून एका इसमाला ठार केले. Another man killed in tiger attack in Chandrapur district
सविस्तर वृत्त याप्रमाणे की आदिवासी समाज नियमित वनदेवतेला पूज्यनीय मानून त्याची पूजा करत आला आहे. यातच चैत्र नवरात्रीपासून ते बुद्ध पौर्णिमा पर्यंत आदिवासी बांधव हे गोंडी देवाची मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना करतात. त्यांचे देव जंगलामध्ये मोहाच्या झाडावर बांधलेले असतात त्यातच काल वाहनगाव येथील शंकर दादाजी मसराम वय वर्ष 48 धंदा मजुरी यांनी नवीन दुचाकी घेतल्यामुळे गावालगत असलेल्या जंगलाच्या आपल्या श्रद्धास्थानी जाऊन पूजा करीत असताना जवळपास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. घरच्यांना वाटले की शंकर मसराम हे नेरीला राहत असल्यामुळे तिथे गेले असेल परंतु काल रात्रीपर्यंत ते नेरी ला सुद्धा पोहोचले नसल्यामुळे आज सकाळी घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली त्यानंतर वन विभागाच्या मदतीने जंगलामध्ये शोध घेतले असता त्यांनी करत असलेल्या पूजनाच्या 200 ते 300 मीटर पर्यंत मसराम यांचे काही अवशेष आढळून आले त्यानंतर सदर अवशेष उत्तरीय तपासणीसाठी वरोरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. व घटनेचा पुढील तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांचे मार्गदर्शनात शेगाव पोलीस करीत आहे.
तसेच वृत्त लीहे पर्यंत संबंधित वन अधिकारी यांना वारंवार फोन द्वारे संपर्क केला असता प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदरची घटना वनक्षेत्रातील नेमकी बफ्फर मध्ये की प्रादेशिक क्षेत्रामध्ये घडली आहे याची माहिती मिळू शकली नाही.
0 comments:
Post a Comment