Ads

भद्रावतीच्या नारायणीची ग्राहक जागरूकता

जावेद शेख भद्रावती, दि. २४ : शहरातील गुरुनगर येथील रहिवासी कु.नारायणी मोघे हिने छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या दुकानदाराविरुद्ध ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे लेखी तक्रार दिली होती.
Narayani of Bhadravati Consumer Awareness
     प्राप्तमाहितीनुसार, नारायणी ही शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, चंद्रपूर येथे शिक्षण घेत आहे. ती आणि तिच्या मैत्रिणी छत्रपती नगर, बल्लारपूर बाईपास येथील एका दुकानातून थंड पेय विकत घ्यायसाठी गेले असता दुकानदाराने त्यांच्याकडून छापील किमतीपेक्षा ५ रुपये जास्त मागितले. त्यावर नारायणी हिने दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जास्त पैसे आपण घेऊ शकत नसल्याचे सांगितले. परंतु दुकानदाराने त्यांचे न एकता अपमानास्पद वागणूक दिली आणि थंड पेय देण्यास नकार दिला. त्यावर नारायणी मोघे हिने ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीकडे लेखी तक्रार दाखल केली. 
     तक्रार मिळताच ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे अध्यक्ष, प्रवीण चिमुरकर यांनी हे प्रकरण जितेंद्र मोरे, उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग, जिल्हा चंद्रपूर यांचे कडे पाठवले. जितेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनात वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक, डी.डी. दंडोरे यांनी धडक कारवाई करत अधिनियम २००९ व २०११, १८(२)नुसार छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यामूळे जप्ती करून प्रकरण दाखल केले.
    ग्राहकाने जागरूक राहणे किती गरजेचे आहे आणि ग्राहक संरक्षण कायदा काय करू शकतो. हे नारायणी मोघे हिने दाखवून दिले. नारायणीच्या या धाडसामुळे ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती चे प्रविण चिमूरकर, डॉ. ज्ञानेश हटवार, वतन लोने, भारत खोब्रागडे, सौ. करूना मोघे, सोनल वावरे, विनोद ठमके, गुरुदेव बावणे आणि प्रतिक्षा बनकरकडून तीचे कौतुक करण्यात आले आणि नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहण्याचे आवाहन केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment