Ads

महावितरणच्या बिलांचा ‘शॉक’! प्रामाणिक ग्राहकाला 1200 वरून 2900 पर्यंत झटका; भेदभावाचा आरोप

 चंद्रपूर | प्रतिनिधी :-
चंद्रपूरच्या बल्लारशाह परिसरातील बालाजी वॉर्डात वीजबिलांबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. अस्मिता अपार्टमेंटमध्ये एकटे राहणाऱ्या सुरेंद्र गांधी यांनी महावितरणवर बिलामध्ये अन्यायकारक वाढ केल्याचा आरोप केला आहे.The ‘Shock’ of Mahavitaran Bills! Honest Consumers Hit with a Hike from 1,200 to 2,900; Allegations of Discrimination
गांधी यांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या थंडीच्या महिन्यांत वीजबिल अनुक्रमे सुमारे 1200 ते 1500 रुपये येत होते. मात्र मार्च महिन्यात हे बिल अचानक 2000 रुपयांपर्यंत वाढले आणि एप्रिलमध्ये थेट 2900 रुपयांचा धक्का बसला.
विशेष म्हणजे, त्याच परिसरातील इतर नागरिकांचे बिल 700 ते 900 रुपयांच्या दरम्यान येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मी एकटाच फ्लॅटमध्ये राहतो, नियमितपणे ऑनलाइन बिल भरतो, तरी माझ्याच बिलात एवढी वाढ का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
गांधी यांनी पुढे सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही फोन उचलला जात नाही. त्यामुळे ग्राहकांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे.
 *📢 मागणी:* 
महावितरणने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून बिलामध्ये पारदर्शकता ठेवावी आणि ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
 *महत्त्वाचा मुद्दा:* 
बिल वाढीमागील कारणे: मीटर रीडिंग, युनिट वाढ, स्लॅब बदल, किंवा अंदाजे बिल?
ग्राहकांना योग्य माहिती दिली जाते का?
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment