गडचांदुर | प्रतिनिधी:
मुंबई इंडियन विरुद्ध पंजाब किंग्स या आयपीएल सामन्यावर सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या मोठ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत गडचांदुर परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्याकडून मोबाईलसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी गडचांदुर पोलीस स्टेशन हद्दीत काही इसम ऑनलाईन बेटिंग आयडीद्वारे IPL सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे तात्काळ छापा टाकण्यात आला.
छाप्यात आरोपी क्रमांक 1) जुबेर रसूल सय्यद (वय 22, रा. धुमनें लेआउट, गडचांदुर) हा माशा अल्लाह बिर्याणी सेंटर समोर मुंबई इंडियन vs पंजाब किंग्स सामन्यावर www.nice7777.fun� या बेटिंग आयडीवर सट्टा खेळताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 20,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे.
या प्रकरणात आरोपीस बेटिंग आयडी पुरवणारा आरोपी क्रमांक 2) रोहित काकडे (रा. गडचांदुर) याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन गडचांदुर येथे अप. क्र. 261/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (A) व भा.न्या.सं. कलम 49 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई राजुरा-गडचांदुर उपविभागातील स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
👉 सट्ट्याच्या वाढत्या प्रकरणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
👉 ऑनलाईन बेटिंग अॅप्सवर पोलिसांचा वाढता धाक
🚨 "सट्टेबाजांवर पोलिसांचा करडा बडगा" — जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आता कडक नजर!
0 comments:
Post a Comment