Ads

ट्रॅक्टरच्या लोखंडी सळाखीने घेतला जीव! वीजताराला स्पर्श होताच तरुणाचा जागीच मृत्यू; एक जखमी

भद्रवती  प्रतिनिधी/ जावेद शेख:-
भद्रावती तालुक्यातील मौजा आष्टा शेतशिवारात रविवारी (दि. 26 एप्रिल 2026) सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. ट्रॅक्टरची पलटी झालेली ट्रॉली सरळ करत असताना लोखंडी सळाखीचा उच्चदाब वीजताराशी संपर्क आल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोधी रोडवरील शेतात दिपक शंभरकर यांचा मातीने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाला होता. यावेळी त्यांचा मुलगा सूरज दिपक शंभरकर (वय अंदाजे 27 वर्ष) व मजूर अक्षय शामदेव कापटे (वय अंदाजे 27 वर्ष, रा. शेगाव खुर्द) हे ट्रॉली सरळ करण्याचा प्रयत्न करत होते.
ट्रॉली उचलण्यासाठी वापरण्यात येत असलेली लोखंडी सळाख जोराने ओढताना ती थेट वरच्या वीजताराला लागली. क्षणात जोरदार विद्युत प्रवाह झाल्याने दोघेही दूर फेकले गेले. या भीषण घटनेत अक्षय कापटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सूरज शंभरकर गंभीर जखमी झाला.
घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी विजय तिवाडे यांनी तत्काळ सरपंच चांगदेव रोडे यांना माहिती दिली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने जखमी सूरज शंभरकर याला चंदनखेडा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, मृतदेहाबाबत पोलिसांना कळविण्यात आले असून पुढील तपास शेगांव बू पोलीस करत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment