चंद्रपुर :- स्थानिक विकलांग सेवा संस्थाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवसाचे औचित्त साधून आंतरजातीय विवाह करणाऱ्या दोन दिव्यांग दाम्पत्याचा एकात्मता वृद्धिंगत योगदान दिल्याबद्दल विकलांग सेवा संस्थेच्या अध्यक्षा वर्षा कोठेकर यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार सम्पन्न झाला .
यावेळी अनुराधा मेश्राम यांनी स्वागत गीत गायलं.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्मान विज कामगार सेनेचे कामगार नेते इंजिनिअर नरेंद्र रहाटे ,देवराव कोंडेकर ,सुभाष शेडमाके ,संजय डाखोरे,अशोक खाडे व अन्य उपस्थित होते.या कार्यक्रमात दिव्यांगाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच दिव्यांग व्यक्ती व उपस्थितांना जागतिक दिव्यांग दिनानिमित्य महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटना सी टी पी एस शाखा ऊर्जानगर च्या वतीने २०२२ ची दिनदर्शिका व डायरी पेन भेट देण्यात आली .शिवभोजन केंद्र तुकुम परिसरात कार्यक्रमाचे असयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा तिवारी यांनी केले तर आभार सीमा ठाकूर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी खुशाल ठलाल,गणेश यांचे सहकार्य लाभले.
0 comments:
Post a Comment