चंद्रपुर :- पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 47 / 2021 कलम 379 भा.दं.वि.चे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असता आरोपी नामे राजेश रमेश पवार वय 19 वर्ष रा. फुक्कटनगर चंद्रपुर हा गुन्हयातील चोरीस गेलेल्या सायकल सोबत मिळुन आला. तसेच त्यास अधिक विचारपुस करता आरोपी राजेश रमेश पवार वय 19 वर्ष रा. फुक्कटनगर चंद्रपुर यांनी गेल्या काही दिवसापासुन चंद्रपुर शहरातुन चोरी केलेले महागडया गेअर व बिनागेअरच्या वेगवेगळ्या कंपनीचे अशा एकुण 21 सायकली हस्तगत करण्यात आले आहे सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक मुळे सा. गुन्हे शोध पथकातील स.पो.नि.हर्षल अकरे, पो.उप.नि. विनोद भुरले व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी केली आहे. तसेच चंदपुर शहरातील कोणाचीही सायकल चोरीला गेली असल्यास पोलीस स्टेशन रामनगर येथे संपर्क करावे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment