घुग्घुस :- घुग्घुस येथील लॉयड्स मेटल कंपनीतून होणारी ओल्डम डस्टची वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात व युवासेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात युवासेना तालुका प्रमुख हेमराज भाऊ बावणे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
घुग्घुस येथील लॉयड्स मेटल कंपनीतुन दररोज 100 ते 150 ट्रकाद्वारे कंपनीच्या आतील ओल्डम डस्टची वाहतूक करून बाहेर निघत आहे व तो डस्ट ट्रका द्वारे विमला सायंडींग व वणी सायडींगच्या दिशेने भरून जात आहे आणि तो कोळश्यात मिसळवीला जात आहे. त्यामुळे याचा भविष्यात पावर प्लांटला फटका बसू शकतो व लोडशेडींग होऊ शकते याचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. या प्रकरणात कंपनीच्या अधिकाऱ्यांचा ही हात असू शकतो त्यामुळे ओल्डम डस्टची वाहतूक तात्काळ बंद करून दोषीवर कारवाही करावी अन्यथा कंपनी गेट समोर शिवसेने तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतांना शिवसेना उप तालुका प्रमुख गणेश भाऊ शेंडे, राज सोपर, नागार्जुन नगराळे, पियुष कांबळे, साहिल आमटे, बलराज सरोज व शिवसैनिक उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment