Ads

मुस्लिम समुदायाने जाणून घेतली पंतप्रधान मोदींची 'मन की बात'

Muslim community learns of PM Modi's 'Mann Ki Baat'
चंद्रपुर :-भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने महानगरातील 300 बूथवर रविवार(30 जानेवारीला 'मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विशेष म्हणजे पटेल नगरातील बूथ क्र.312 वर मुस्लिम भगिनींनी पुढाकार घेत,माजी अर्थमंत्री,विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आयोजन केले.यावेळी परिसरातील मुस्लिम समुदायासह नागरीकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,भाजपा नेते प्रमोद कडू,महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,देवानंद वाढई,राकेश बोमनवार,डॉ दीपक भट्टाचार्य,संदीप देशपांडे,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी आ मुनगंटीवार म्हणाले,देशातील नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी व लोककल्‍याणाच्‍या दृष्‍टीने हितगुज करण्‍यासाठी ‘मन की बात’ हा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी सुरू केला.राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या पुण्‍यतिथीचे अर्थात हुतात्‍मा दिनाचे औचित्य साधुन चंद्रपूर महानगरातील ३०० बुथवर मन की बात ऐकण्‍याचे नियोजन भारतीय जनता पार्टी महानगरने केले आहे. पंतप्रधानांची मन की बात एका कानाने ऐकणे व दुस-या कानाने सोडून देण्‍यासाठी नाही तर या देशाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करण्‍याचे संवादप्रधान माध्‍यम आहे.हे वर्ष देशाच्‍या स्‍वातंत्र्याचे अमृतमहोत्‍सवी वर्ष आहे. शेकडो देशभक्‍तांनी स्‍वातंत्र्यासाठी आपल्‍या प्राणांचे बलिदान देत स्‍वातंत्र्याचा हा मंगलकलश आपल्‍या हाती सोपविला तो या देशाच्‍या विकासासाठी, सर्वसामान्‍यांच्‍या कल्‍याणासाठीच. हुतात्‍म्‍यांचे हे बलिदान सार्थ ठरविण्‍याची जबाबदारी आपली आहे. या देशाच्‍या प्रगतीचे आकलन धनाच्‍या नाही तर समाधानाच्‍या आधारे केले जाते असे सांगत,पंतप्रधानांच्‍या मन की बात मधील मार्गदर्शनाच्‍या माध्‍यमातुन हा देश विकासाच्‍या मार्गावर कायम अग्रेसर राहील असा विश्‍वास आ मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.यावेळी मुस्लिम बांधवांनी आ.मुनगंटीवार यांना पवित्र कुराण शरीफ,तसबी व टोपी प्रदान करून गौरवान्वित केले.यावेळी आ.मुनगंटीवार यांचे हस्ते प्रभाग क्र.01 च्या गरजू नागरिकांसाठी अटल मध्यान्ह भोजन व इ श्रमिक कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक इंजि.सुभाष कासंगोट्टूवार यांनी,तर संचालन महिला मोर्चा महामंत्री प्राचार्य प्रज्ञा गंदेवार यांनी केले.महिला मोर्चा उपाध्यक्ष मंजुश्री कासंगोट्टूवार यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी शहनवाज शेख,सैफुल्ला पठाण,सोहेल शेख,राजू मौलदुर,अदनान खान,राहुल सिंह,निशा राजपूत,प्रीती निलवार,इरफान भाई,आदींनी परिश्रम घेतले.

*मुस्लिम बांधव व भगिनींचा सत्कार*
यावेळी मन की बातचे विशेष आयोजन करणाऱ्या मुस्लिम भगिनींचा आ मुनगंटीवार यांचे हस्ते इमान व तसबी(जपमाळ) देऊन सत्कार करण्यात आला,यात ऍड शमा पठाण,दानिशदा अनिस,नसरीन बानो,रुकैया दीदी,अंजुम बानो व गिलानी यांचा समावेश होता. तर,मौलाना सैयद अशरफ अली,मौलाना तन्वीर,मौलाना अन्सार अत्तारी यांना तसबी(जपमाळ),टोपी व गमछा(पंचा) देऊन आ.मुनगंटीवार यांनी सन्मानित केले.
*त्या रस्त्याला मन की बात मार्ग,असे नाव द्या*
पटेलनगर येथे येताना तेथील रस्‍ता कच्‍चा बघून आ. मुनगंटीवार यांनी महापौर राखी कंचर्लावार यांना पक्‍क्‍या रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍याचे निर्देश दिले. या रस्‍त्‍याला ‘मन की बात मार्ग’ असे नामकरण करण्‍याच्‍या सुचना देखील त्‍यांनी केल्‍या. हा रस्‍ता उत्‍तम दर्जाचा व्‍हावा याकडे नागरिकांनी स्‍वतः लक्ष देण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment