Ads

भ्रष्टाचाराची पाठराखण करणाऱ्या नगरसेवकांविरूध्द महानगरपालिका निवडणूकीत सक्षम उमेदवार देणार.

The corporation will field competent candidates in the elections against the corporators who are pursuing corruption
चंद्रपुर :- चार वर्षात चंद्रपुर शहर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी करोडो रुपयांचे घोटाळे केले.घाम गाळून चंद्रपूरकरांनी दिलेल्या टॅक्सच्या पैशाचा हा दुरुपयोग आहे. याबाबत मनपा सभागृहात वेळोवेळी पुरावे सादर केले. मात्र सत्ताधाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. अनेक नगरसेवकांनी सुध्दा भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलण्याचे टाळले. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराची पाठराखण करणाऱ्या अशा नगरसेवकांच्या विरोधात पूर्ण ताकदीने उमेदवार उभे करण्यात येतील असे प्रतिपादन जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले. जनविकासनेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.
पुढे ते म्हणाले की 15 वर्षांपासून चंद्रपूर शहरांमध्ये रस्ते खोदण्याचे काम सातत्याने सुरू आहे. धूळ व प्रदूषणामुळे चंद्रपूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चंद्रपूर शहरातील लहान मुलांच्या आरोग्यावर सुध्दा याचे गंभीर परिणाम झालेले आहेत. तत्कालीन नगरपालिका व आताच्या महानगरपालिकेतील भोंगळ कारभार व भ्रष्टाचारामुळे सामान्य चंद्रपूरकरांचे हाल होत आहेत. मात्र भोंगळ कारभाराच्या विरुद्ध सत्ताधारी तसेच विरोधातील अनेक नगरसेवक भूमिका घेण्याचे टाळतात. भ्रष्टाचाराचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या अशा सर्व नगरसेवकां विरूद्ध तगडे उमेदवार उभे करून त्यांना घरी बसवणार व महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जनविकास सेना पूर्ण प्रयत्न करणार अशी भूमिका देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.
जनविकास सेनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जुना वरोरा नाका चौकातील श्रमिक पत्रकार भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविणभाऊ खोब्रागडे, प्रमुख अतिथी म्हणून शहर विकास आघाडीचे नगरसेवक तसेच चंद्रपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिपक जयस्वाल, भिवापूर प्रभागाच्या नगरसेविका मंगला आखरे, बाबुपेठ प्रभागाचे नगरसेवक स्नेहल रामटेके, चंद्रपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल दहांगावकर, सामाजिक कार्यकर्त्या निर्मला नगराळे, जनविकासचे उपाध्यक्ष घनश्याम येरगुडे, जनविकासचे ग्रामीण चे उपाध्यक्ष अनिल कोयचाळे उपस्थित होते.
नगरसेवक पप्पू देशमुख यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन समविचारी लोकांची मोट बांधण्याचासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन प्रविण उर्फ बाळूभाऊ खोब्रागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी घराचे 300 चौरस फूट पेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या चंद्रपूरातील नागरिकांना मालमत्ता करातून सूट देणे गरजेचे असल्याची भूमिका व्यक्त केली. नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी जनविकास च्या उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक अक्षय येरगुडे व सुत्रसंचालन राहुल दडमल व आभार प्रदर्शन मनीषा बोबडे यांनी केले.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment