ब्रम्हपुरी प्रतिनिधी :-तालुक्यात मागील तीन दिवसापासून अवकाळी पावसाने रब्बीपीकतील मूग उडीद जवस लाखोरी चना गहू तसेच कापणी करिता आलेले तुरीचे पीक पावसाने झोडपले त्याच प्रमाणे भाजी पाल्याचे फार नुकसान व मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी झाली यावर्षी निसर्गाच्या प्रकोपामुळे पन्नास टक्केही पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडने दुरापास्त झाले यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सातत्याने होत असलेली नापिकी बदलते हवामान यामुळे परंपरागत शेती संकटात सापडले आहे.शेतकरी कर्जबाजारी मुळे वैतागला आहे .वाढता शेतीचा खर्च मजुरांची होणारी वणवण, रासायनिक खत बी बियाणेचे वाढलेले भाव यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले असताना हातात आलेले रब्बीचे पीक अवकाळी पावसाने भुई सपाट झाल्यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकटाचे आभाळ कोसळले आहे गेल्या दोन वर्षापासून कोरणा अतिवृष्टी अळी अशा अनंत संकटांमध्ये शेतकरी अडकून पडला आहे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकाची नासाडी झाल्यामुळे झालेल्या रब्बी पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी केली आहे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment