कोरपना : कोंबड्याच्या पायाला कात्या बांधून झुंज लावून जुगार खेळणाऱ्या इसमांविरुद्ध कोरपना पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत ७ दुचाकींसह एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.Crime News
दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन कोरपना हद्दीतील मौजा शिवापूर गावातील शेतशिवार परिसरात काही इसम कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोरपना पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपी नामे (१) गजु आत्राम, (२) दौलत पिंपळशेंडे, (३) देवराव कोडापे यांना अटक करण्यात आली.
अटक आरोपींच्या ताब्यातून नगदी रोख रक्कम, ३ कोंबडे, ३ कात्या तसेच अटक आरोपी व पसार झालेल्या आरोपींच्या एकूण ७ मोटारसायकली असा एकूण ३,९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्य आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर श्री. रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती लता वाडीवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोउपनि देवानंद केकन, पोहवा/२१७२ बळीराम, पोहवा/१२२७ नामदेव, पोअं/२१४ विनोद, पोअं/५५४ साटव, पोअं/१६६८ लक्ष्मण, पोअं/११३४ दीपक आदींनी ही यशस्वी कामगिरी बजावली.
0 comments:
Post a Comment