Ads

लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटनभद्रावती तालुका प्रतिनिधी :-
लोकसेवा मंडळ भद्रावती संचलित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाच्या रासेयो विभागांतर्गत स्पर्धा परीक्षा अभ्यास तथा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन दिनांक सहा जानेवारी ला संपन्न झाले.
लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकसभा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून छत्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय ,मोरवा चे संस्थाचालक प्रा. दिलीप चौधरी हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे सचिव मनोहर पारधे,सहसचिव नामदेव कोल्हे, सदस्य गोपाल ठेंगणे ,अविनाश पांपट्टीवार, आशिष गुंडावर, प्रा.धनराज आस्वले ,मते, वासाडे, प्राचार्य बंडू दरेकर उपप्राचार्य आशालता सोनटक्के उपस्थित होते.

सदर स्पर्धा परीक्षा अभ्यास व मार्गदर्शन केंद्र याद्वारे विद्यार्थ्यांना नियमितपणे तसेच नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे विभागवार गट तयार करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षा संदर्भात विविधांगी माहिती प्रा.दिलीप चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर द्वारे दाखवली. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे आवड निर्माण केली. सर्वसामान्य कुटुंबातील तळागळातील विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा वेध घेऊन स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, प्रशासकीय संधी ,अभ्यासक्रम, एमपीएससी ,यूपीएससी, परीक्षांचे पेपर पॅटर्न, पूर्व -मुख्य परीक्षा व मुलाखत ,परीक्षांची तयारी इत्यादी विषयांची सविस्तर माहिती अगदी सहज सोप्या पण प्रभावी शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिली.
स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहित करण्याचा लोकसेवा मंडळाचा मानस लोक सेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला. व सदर केंद्र लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे एक ॲसेट व्हावे अशी इच्छाही व्यक्त केली.
आज स्पर्धात्मक परीक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विविध क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असतातच. त्याला केवळ योग्य दिशा देण्याची गरज असते. या परीक्षेची तयारी शालेय स्तराव रूनच केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. याच दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास व मार्गदर्शन हा उपक्रम लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय या सत्रापासून हाती घेत असल्याची माहिती प्रा .सचिन सरपटवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष आकोजवर, प्रास्ताविक सचिन सरपटवार तर आभार प्राचार्य बंडू दरेकर यांनी मानले .याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment