भद्रावती(तालुका प्रतिनिधी):
येथील माना जमात वधू-वर सूचक मंडळातर्फे दि.३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात आदिवासी माना जमातीच्या राष्ट्रीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या मेळाव्याचे हे २६ वे वर्ष आहे. मेळाव्यात १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उपवर-वधू परिचय, स्मरणिका प्रकाशन, मान्यवरांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. कोविड-१९ ची परिस्थिती पाहून ऑनलाइन किंवा ऑफलाईन मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल.तसे मेळाव्यापूर्वी कळविण्यात येईल.
मार्च २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेल्या वर्ग १० व १२ च्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेराॅक्स प्रत, उपवर-वधूंची सविस्तर माहिती, स्मरणिकेकरिता समाजप्रबोधनपर लेख, कविता, शुभेच्छापर जाहिरात संजय व्यंकटराव गायकवाड, सुरक्षानगर, भद्रावती या पत्त्यावर दि.१५ जानेवारी पर्यंत पाठवावे. अधिक माहितीकरिता संजय गायकवाड मो.९९२१९८९८२५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment