Ads

माजरीतील एक ही घर व दुकाने पाडल्यास गुन्हा दाखल करू - श्री विजय भाऊ वड़ेट्टीवार


If one of the houses and shops in Mazari is demolished, we will file a case- Shri Vijay Bhau Vadettiwar
चंद्रपुर :-आज दिनांक 07.01.22 रोजी दुपारी 1.30. वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 20 कलमी सभागृहात पालक मंत्री श्री विजय भाऊ वड़ेट्टीवार यांचे सोबत माजरी व्यापारी असोसिएशन व माजरी संघर्ष समिति ची,चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघ चे अध्यक्ष श्री सदानंद खत्री यांचे नेतृत्वात , माजरी च्या व्यापार्या ची दुकाने व रहीवाशांची घरे खाली करण्या संबधित रेलवे विभागा कडून आलेल्या नोटिस बद्दल ची मीटिंग घेण्यात आली या सभेतचंद्रपुर चे जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने,वरोरा चे एस डी एम श्री सुभाष शिंदे,श्री भद्रावती तहसीलदार श्री राजेद्र वाघचौरे, वेकोली चे जीएम श्री बी.के.गुप्ताजी , रेलवे चे श्री राणे, व सुरक्षा अधिकारी श्री झा, ग्राम विकास भद्रावती बीडिओ श्री मंगेश आरेवार, सरपंच सौ. छाया जंगम, माजरी ग्राम विकास अधिकारी श्री गणवीर,माजरी चे थानेदार श्री विनीत घागे तर व्यापारी तर्फे चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघ चे अध्यक्ष श्री सदानंद खत्री, माजरी संघर्ष समिति चे अध्यक्ष श्री प्रवीण सूर, सदस्य श्री रमेश कातकर, माजरी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्री उल्हास रत्नपारखी, सचिव श्री राजेश रेवते, उपस्थित होते.
वेकोली माजरीत एकूण साडेतीन हजारांहून ही अधिक घरे असून पंचवीस ते तीस हजाराची लोक वस्ती आहे या ठिकाणी वेकोलिच्या कोळसा रेल्वे सायडिंग करिता 50 वर्षाहुन अधिक काळापासुन राहात आहे 500 ते 600 लोकांचे पक्के घर व दुकान तोडण्याकरिता रेल्वे प्रशासन कडुन वारंवार नोटिस देवून हटविण्याच्या प्रयत्न करित आहे.वेकोलि माजरीच्या कोळसा रेल्वे सायडिंग व कोळसा वाहतुकीमुळे संपूर्ण माजरीत प्रदूषण मोठ्याप्रमाणात पसरले असुन या प्रदूषणामुळे दर महिण्या दोन महिण्यात येथील लोकांचे जिव जात आहे व शेकडों लोक प्रदूषणामुळे बिमार पडत आहे . वेकोलि द्वारा प्रदूषणात रोकथामसाठी कोणतीच उपाय योजना करत नाही . वेकोलि माजरीच्या यूजी टू ओसी नागलोन कोळसा खदानीच्या ब्लास्टिंमुळे या खदानीच्या लगत असलेल्या घरांना भेगा पडलेले आहे व अनेक घरे ब्लास्टींगमुळे पडले आहे .वेकोली ची नवीन कोळसा सायडिंग मुळे संपूर्ण व्यापारी आणि वसाहत च्या लोकांचे या सायडिंग मुळे अस्तित्व संपणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील पालकमंत्री ला 25 डिसेंबर ला निवेदन देण्यात आले होते त्यावर आज पालकमंत्री नि जिल्हाधिकारी कडे बैठक लावून व्यापारी संघटना आणि माजरी संघर्ष समिती सोबत रेल्वे प्रशासन वेकोली प्रशासन पोलीस प्रशासन उपविभागीय अधिकारी वरोरा तहसीलदार भद्रावती माजरी ग्रामपंचायत सह बैठक संपन्न झाली
यावर पालक मंत्री यानि व्यापरांना व रहिवाशी ना दिलासा दिलेला असून त्यांची जागा खाली करण्यात येणार नाही असे उपस्थित रेलवे अधिकार्याना सांगितले व केल्यास वेकोली आणि रेल्वे वर गुन्हा दाखल करू असे बैठकीत खडसावले. माजरी येथे स्पॉटवर येऊन स्वतः निरिक्षण ही करण्याचे व महाराष्ट्र शासनच्या सम्मति शिवाय आपन ही जागा खाली करू शकणार नाही असेही ते म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment