पोंभूर्णा:- प्रतिनिधी पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील रोजगार हमी योजनेच्या कामावरच्या मजूराचा शुक्रवारला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
देवाडा खुर्द येथील विलास नारायण बुरांडे हे रोजगार हमीच्या कामावर जात होते.गुरूवारला रोजगार हमीचे कामावर असतानाच दुपारी त्याच्या छातीत दुखायला लागले होते. मात्र पैशाची चणचण असल्याने ते त्यादिवशी दवाखाण्यात जावू शकले नाही.
शुक्रवारी पुन्हा रोजगार हमीच्या कामावर जाण्यासाठी तयारी करीत असतांनाच सकाळी ७ वाजताच्या दरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि कुणाला कळायच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या मागे पत्नी,तीन मुली, जावई, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.
विलास बुरांडे हे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे पहिले अध्यक्ष होते. कॉम्रेड म्हणून त्यांची ओळख होती. गावातील एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व व उत्तम मेहनती शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती.तंटामुक्त समीतीच्या कार्यकाळात त्यांनी गावातील बहुतांश भांडण तंट्टे आपसी सहमतीने गावातच सोडविण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात शासनस्तरावरून देण्यात येणारा दोन लक्ष रूपयाचा तंटामुक्ती पुरस्कार देवाडा खुर्द गावाला प्राप्त झाला आहे. त्यांच्या जाण्याने गावातील सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.
0 comments:
Post a Comment