Ads

पालकमंत्री ना. विजय भाऊ वडेट्टीवार यांचे कडून गरजूला आर्थिक मदत

सावली प्रतिनिधी :-
मौजा पेंढरी मक्ता येथील युवक नामे रुपचंद दादाजी गोरडवार वय 31 वर्ष हा मिस्त्री करण्यासाठी हीरापुर येथे गेलेला असता त्याला वरून गेलेल्या 33 केव्ही चा करंट लागल्याने त्या युवकाचा उजवा पाय पूर्ण भाजला गेला आणि त्याची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्याला उपचार करणे कठीण होते,
त्यावेळी पेंढरी मक्ता येथील काँग्रेस बूथ कमिटी चे अध्यक्ष लखन मेश्राम यांनी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नितीन भाऊ गोहने यांना माहिती कळवली, त्याच अनुषगाने चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी जन सेवा, हिच खरी ईशवरसेवा समजून जसे भाऊ ला माहित झाले तसेच भाऊंनी काल दिनांक 6/01/2022 रोज गुरवार ला तात्काळ 5000 रू आर्थिक मदत देवून त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी पाठवून सहकार्य करण्याची हमी देण्यात आली.
त्याला आर्थिक मदत देत असताना त्यावेळी उपस्थित, तालुका काँग्रेस चे विद्यमान अध्यक्ष नितीन गोहणें, बूथ कमिटी अध्यक्ष, लखन मेश्राम, उपाध्यक्ष अंजु बोरेवार, बोथली चे काँग्रेस कार्यकर्ते नरेश पाटील गड्ड मवार, सामजिक कार्यकर्ते टीकेश नरेडीवार, मुखरू गोहने, राकेश गड्डमवार, विजय गावले, नितीन गोरदवार, तुषार मेश्राम, अलाम साहेब, रवी ढोले, आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment