चंद्रपुर :-वरोरा चंद्रपूर बल्लारपूर बामणी टोल रोड लिमिटेड,नागपूर या कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नोटीस बजावला आहे.कंपनीने राज्य मार्ग 264 या चौपदरीकरण टोल रस्त्याचे देखभाल व दुरुस्ती त्वरित न केल्यास खात्यामार्फत कामे करून नुकसानभरपाई वसूल करण्याची चेतावणी सा.बां.विभागाने दिली आहे.विशेष म्हणजे या कंपनीला मागील 2 वर्षात 18 पत्रे याच कामांसाठी पाठविण्यात आली होती.पण कंपनीने सर्व पत्रांना केराची टोपली दाखवली.त्यामुळे टोल रोड कंपनीला कुणाचा आशीर्वाद..?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
*काय आहे मूळ समस्या*
पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी सा बां विभागाला पत्र लिहून राज्यमार्ग क्र.264 या बीओटी रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून पांढरे पट्टे,झेब्रा क्रॉसिंग पट्टे,स्पीड ब्रेकर व त्यावरील पट्टे मिटलेले आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे असे कळविले.पहिले पत्र 31/8/20 ला तर 20 वे पत्र 16/11/21 ला पाठविण्यात आले.याच पत्रांच्या आधारावर सा बां विभागाने वरोरा चंद्रपूर बल्लारपूर टोल रोड कंपनी लिमिटेडला वारंवार सूचना केल्या.पण सदरहू कंपनीने दखल घेतली नाही.
*कोणती कामे कंपनीने करणे अपेक्षित..?*
टोल रोड कंपनी नियमित टोल वसूल करीत आहे.रस्त्यावरील खड्डे डांबराने भरून रस्ता वाहतुकीस योग्य करणे,रस्ता दुभाजकांवर झाडे लावणे,थर्मोप्लॅस्टिक पेंट मारणे,बाजु पट्ट्या भरणे,कॅट आय लावणे,डेलीनेटर्स लावणे व ब्रेकर करणे ही कामे करण्याचे निर्देश एक दोन नाही तर 20 पत्र पाठवून देण्यात आले.टोल वसूल करणाऱ्या कंपनीने वरील कामे आपसूकच करणे अपेक्षित आहे.
*17 जागी डाबंरीकरणाची गरज*
उपविभागीय अधिकारी सा.बां.उपविभाग,भद्रावती यांनी मोबाईलवर अनेक वेळा टोल रोड कंपनीला सूचना केल्या पण कंपनीने लक्ष दिले नाही.आता पुन्हा एक पत्र 13 डिसेंबर21 ला पाठविण्यात आले आहे.या पत्रात वरोरा, नांदोरी, टाकळी, भद्रावती, सुमठाणा रेलवे गेट, घोट निंबाळा फाटा, घोडपेठ, उर्जानगर, ताडाळी, मोरवा, पडोली, इरई नदी जवळ, जुनोना, सैनिक शाळा, बल्लारपूर, बामणी या 17 स्थळांवर डांबरीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
0 comments:
Post a Comment