भद्रावती जावेद शेख :-Accident
एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 32 वर्षीय गावकऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटना दिनांक 17 रोज शनिवारला रात्रो नऊ वाजताच्या सुमारास कोंढा रस्त्यावर घडली.
Villager dies in hit by unknown truck.
किशोर देठे, वय 32 वर्षे ,राहणार कढोली असे मृत गावकऱ्याचे नाव आहे. सदर मृतक हा रात्रोच्या वेळेस या रस्त्यावरून पैदल जात असता एका अज्ञात ट्रकने त्याला धडक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला.सदर ट्रक हा कर्नाटका एम्टा कंपनीचा असल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही. सदर घटनेचा पंचनामा भद्रावती पोलिसांनी करून अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.पोलीस अज्ञात ट्रकचा शोध घेत आहे.
0 comments:
Post a Comment