Ads

कारची दुचाकीला धडक ; एक महिला ठार

सादिक थैम वरोरा: Accident
मालवे दापंत्य आपल्या एम एच २९ सी एच ४२८५ या दुचाकीने खांबाद्याजवलील हिरापूरवरून नागपूर - चंद्रपूर महामार्गावरून वरोऱ्याकडे येत असताना मागून येणाऱ्या एम एच ०१ डी डी ०९१६ कारने दुचाकीला धडक दिली.दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले आणि डिव्हायडरला ठोसले.सदर अपघातात दुचाकीवर स्वार असलेले पती - पत्नी व मुलगा यामधून पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आणि मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.
Car hits bike; one woman killed
मृतक महिलेचे नाव संजीवनी शालिक मालवे वय ३० वर्ष,जखमी इसमाचे नाव शालीक सदाशिव मालवे वय ४० वर्ष ,मुलगा कार्तिक शालीक मालवे वय ३ वर्ष हे सर्व राहणार डोंगरगाव , ता.झरी जामनी,जिल्हा यवतमाळ असे आहे.घटना १९ मे २०२५ ला दुपारी २.००.ते २.३० दरम्यान नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील टेमुर्डा - मांगली मध्यंतरी घडली.
सविस्तर वृत्त असे की,मृतक महिला संजीवनी मालवे , पती व मुलगा हे तिघेही १८ मे २०२५ ला आपल्या दुचाकी क्र.एम एच २९ सी एच ४२८५ या वाहनाने एका लग्न समारंभाला वरोऱ्याला आले होते.लग्न आटोपल्यानंतर मृतक महिलेचे माहेर खांबाद्याजवलील हिरापुर असल्यामुळे त्यांनी तिथे रात्रौ मुक्काम केला.आणि १९ मे २०२५ ला आपल्या स्वगावी परतीच्या प्रवासाला निघाले.परंतु नकळत काळ त्यांची वाट पाहत असावा.दुचाकीने वरोरा दिशेने येत असता त्याच दिशेने मागून येणाऱ्या एम एच ०१ डी बी.०९१६ क्रमांकाचे कारने दुचाकीला धडक दिली .यामध्ये दुचाकीवरील स्वार महिला संजीवनी हीचा मृत्यू झाला तर पती शालीक हा गंभीर जखमी झाला असून तीन वर्षाचा बालक मात्र किरकोळ जखमी झाला असून दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने तो बचावला.जखमीवर
उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार सुरू आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय बलकी करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment