मूल /नासिर खान:-मुल तालुक्यातील चितेगाव बस स्थानका जवळ मॅजिक काडी पिवळी आणि ट्रकचा मोठा अपघात झाल्याची घटना आज मंगळवार ला दुपारी चार वाजता चे दरम्यान घडले. मॅजिक गाडीचा ड्रायव्हर घटनास्थळी मृत पावला. तर एक महिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करताना मृत पावली.
निर्दोष प्रभाकर मोहरले काडी पिवळी ड्रायव्हर वय वर्ष 35 राहणार राजोली आणि मनाबाई देवाजीसी डांब वय वर्ष 75 सरळपाळ तालुका सिंदेवाही हे मृतकांचे नावे आहेत. 17 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
मनाबाई देवाजी सिडाम वय 75 सरळपाळ तालुका सिंदेवाही, शंकर श्रावण चापले वय 55 भेंडाळा तालुका चामुर्शी, अंजनाबाई नीलकंठ आभारे वयसाट उसेगाव तालुका सावली, संदीप सूर्यभान आमले नागपूर, रामदास हजारे वय 55 जयरामपूर तालुका चामोर्शी, मारुती देवावार, वय 31 जयरामपूर तालुका चामुर्शी, शोभा मोहरले वय 40 मोरवाई तालुका मुल, उज्वला राऊत वय 31 मोरवाही तालुका मूल, पूजा गेडाम वय 27 राजोली तालुका मूल, मारुती वाघाडे वय 14 हळदी तालुका मूल, आनंदाबाई भगत वय 70 हिरापूर तालुका सावली, रुजवान राकेश जुमडे वय आठ वर्ष शिंदेवाही, शितल राकेश जुमडे आदी जखमींची नावे आहेत.
जखमींना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मोठा अपघात झाल्याने मुल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर लाडे यांचे मार्गदर्शनात सर्व डॉक्टर स्टाफ यांनी रुग्णांचे उपचार करून गंभीर रुग्णांना रेफर केले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment